Nashik Crime News esakal
नाशिक

Crime : महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

विजय पगार

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील मुकणे येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव यांच्या आई अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दीड लाखाचे सोन्याचे दागिने (gold jewelry) दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी (Thieves) दिवसाढवळ्या गळ्यातून ओरबाडून पळविले. ही घटना सोमवारी (ता. ३०) कावनई शिवारात घडली. (Thieves looted women jewelry at Igatpuri Nashik Crime News)

मुकणे (ता. इगतपुरी) येथील ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ राव व त्यांचे कुटुंब कावनई रोडवरील वाघोबावाडी व बळवंतराव वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत शेतावर राहतात. तेथे त्यांचे किराणा दुकान आहे. दुपारी घरी कोणी नसल्याने त्यांची आई अनुसयाबाई राव दुकानावर थांबल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून आले. बिस्किट पुडे घेण्याच्या बहाण्याने एकजण दुकानावर गेला व एक गाडीवरच थांबून होता.

अनुसयाबाई यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या पोती (अंदाजे किंमत दोन लाख) गळ्यातून हिसकावून दोघांनीही गाडीवरून पलायन केले. अनुसयाबाई यांनी आरडाओरडा केला. मात्र चोरटे दुचाकीवरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. श्रीक्षेत्र कावनईजवळच असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. शहरी भागात कायम होणाऱ्या घटनांची पुनरावृत्ती ग्रामीण भागातही होऊ लागल्याने त्याचा वेळीच घोटी पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT