Tomato Theft esakal
नाशिक

Nashik Crime News : मखमलाबाद शिवारात टोमॅटोची चोरी; शेतकरी ‘भुरट्यां’मुळे त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे मखमलाबाद शिवारात टोमॅटो काढण्याचे काम सुरू आहे. शेतमळ्यात काढलेले टोमॅटोच्या दोन-चार जाळ्या भुरट्या चोरट्यांनी रात्री लंपास केल्या. याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी म्हसरुळ पोलिसांकडून तक्रार करूनही टोमॅटो चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. (Tomato theft in Makhmalabad Shiwar nashik Latest Crime News)

अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातही शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित हवामानातही वाचवून पीक जगविली. टोमॅटोला सध्या चांगला बाजारभाव मिळत असून, मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपयांना प्रतिजाळी (कॅरेट) विकली जात आहे. मखमलाबाद शिवारात टोमॅटोचे पीक घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी व मजूर दिवसभर टोमॅटो काढतात. सायंकाळी टोमॅटोच्या जाळ्या भरून शेतमळ्यातच ठेवतात. पहाटे या जाळ्या पीकअपमधून मार्केटमध्ये लिलावासाठी नेल्या जातात.

मात्र, मखमलाबाद शिवारात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळी भुरटे चोरटे मळ्यांमध्ये जाऊन दोन-चार टोमॅटोच्या जाळ्या लंपास करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा फटका बसत आहे. यासंदर्भात ज्ञानेश्‍वर पिंगळे, शंकर पिंगळे यांच्यासह त्रस्त शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलिसांकडे या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही मखमलाबाद शिवारात टोमॅटो चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त असून, पोलिसांनी तातडीने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT