tomato  esakal
नाशिक

Nashik Tomato Rates Fall: टोमॅटोची लाली ओसरली! 15 दिवसांच्या तुलनेत 2 हजारांनी कोसळले बाजारभाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rates Fall : अडीच हजार रुपये क्रेट, असा सर्वकालीन उच्चांकी दर पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्‌सला मिळत होता. हाच दर आता ६०० ते ७०० रुपये क्रेटपर्यंत गडगडला आहे.

वाढलेल्या आवकेने बाजारभावातील तेजी व टोमॅटोची लाली ओसरली आहे. बाजारभावाबाबत बेभरवशाचे व जुगारी पीक, असे टोमॅटोबाबत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बाजारभाव कोसळल्याने मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची पदरी निशारा येण्याची चिन्हे आहेत. (tomatoes Market prices fell by 2 thousand compared to 15 days nashik)

पिंपळगाव बाजार समितीच्या टोमॅटोच्या हंगामाची ऐतिहासीक उंचीच्या दराने सुरवात झाली. सुमारे दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्रेट्‌स असा दर १५ दिवसांपूर्वी टिकून होता, पण केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयातीचे स्वीकारलेले धोरण बाजारभाव कोसळण्याला पुरेसे ठरले.

ही घसरण थांबविण्याचे नाव घेताना दिसत नाही. बंगळुरुच्या कोल्हार, चिंतामणी व सोलापूर, लातूर येथे १५ लाख क्रेटपर्यंत आवक होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिवाय पिंपळगाव बसवंत बाजार समितीतही दररोज ३५ हजार क्रेट्‌स, तर नाशिक जिल्ह्यात एकूण दोन लाख क्रेट्‌सची आवक होऊ लागली आहे.

पिंपळगाव बाजार समितीत ६०० रुपये प्रतिक्रेट दर

वाढलेल्या आवकेचा दरावर दबाव आला आहे. पिंपळगाव बाजार समितीत सरासरी ६०० रुपये प्रतिक्रेट्‌सने टोमॅटोची विक्री झाली.

सध्या मागणी व पुरवठ्याचे समीकरण योग्य असल्याने दरातील तेजी ओसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश, दिल्ली येथून टोमॅटोला मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT