Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांची हॉटेल एजंटकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime : उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांना नाशिकच्या निसर्गाची भुरळ असते. पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात नाशिक परिसरात येत असतात.

मात्र, या पर्यटकांची हॉटेल एजंटकडून बुकिंगमध्ये फसवणूक होत असल्याचा प्रकार घडत आहे. (Tourists cheated by hotel agents in North Maharashtra Nashik Fraud Crime)

गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांनी इगतपुरीतील हॉटेल एजंटमार्फत बुकिंग केले. पर्यटक शनिवारी एजंटकडून बुकिंग केलेल्या हॉटेलमध्ये गेले. या ठिकाणी त्यांना तुमची बुकिंग नसल्याचे सांगून बाहेरचा मार्ग दाखविला.

पर्यटकांनी संबंधित एजंटांकडे चौकशी केली असता, त्याने वेळ मारून नेत त्र्यंबकेश्‍वरजवळील हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पर्यटक तब्बल ५० ते ६० किलोमीटर पुन्हा प्रवास करीत संबंधित हॉटेलमध्ये आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नव्हती. डॉस, माश्‍या अधिक प्रमाणात होत्या. एजंटाशी पुन्हा संपर्क केला; मात्र त्याने पुन्हा उडवाउडवीचे उत्तर दिली. पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हजारो रुपये देऊन मनस्तापाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, इगतपुरीच्या हॉटेल व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता असा प्रकार गेल्या काही दिवसांपासून घडत असल्याचे सांगितले. हॉटेलचे बुकिंग अधिकृत फर्म किंवा अधिकृत संकेतस्थळावरून करावे, असेही हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT