drunken pickup driver esakal
नाशिक

पिकअपच्या धडकेत थोडक्यात बचावला वाहतूक पोलिस; तक्रार मात्र दाखल नाही

नरेश हाळणोर

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका येथे भरधाव पिक-अपने कर्तव्य बजावून घराकडे परतणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या दुचाकीला पाठीमागून धडक (Collision) दिली. सुदैवाने त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही, तर जागरूक नागरिकांनी पाठलाग करून पिक-अपला रोखले असता, संशयित चालक मद्यधुंद (Drunken) अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, या प्रकरणी जखमी वाहतूक पोलिसानेच तक्रार दाखल न केल्याने नागरिकांनी मात्र आश्‍चर्य व्यक्त केले. (Traffic cop saved from collision with pickup But the complaint is not filed nashik crime latest marathi news)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १७) रात्री दुचाकीवरून वाहतूक शाखेचे हवालदार नाक्याकडून पुढे जात होते. त्या वेळी पाठीमागून भरधाव पिक-अप वाहनाने हवालदाराच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात ते रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन त्यांच्या हाताला खरचटले. अपघात झाल्याचे पाहूनही पिक-अपचालकाने वाहन थांबविले नाही. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या काही युवकांनी पिक-अपचा पाठलाग करून त्यास रोखले.

संशयित चालक दारूच्या नशेत धुंद होता. जमावाने त्यास मारहाण करून पिक-अपची चावी काढून घेतली. तसेच, काहींनी आडगाव पोलिस ठाण्यास संपर्क साधला. दरम्यान, जखमी हवालदारही घटनास्थळी आले, तसेच आडगाव पोलिसांचे एक पथकही पोचले.

संशयित चालकाची झडती घेतली असता, त्याच्याकडे नशेचे पदार्थही आढळून आले. पोलिसांनी त्याला वाहनासह आडगाव पोलिस ठाण्याकडे नेले.

...तर सर्वसामान्यांनी काय करावे?

अपघातानंतर जखमी वाहतूक पोलिस हवालदाराने ठाण्यात तक्रार देणे अपेक्षित होते. तसे करण्यास उपस्थित नागरिकांनी सांगितलेही. मात्र संबंधित हवालदाराने तक्रार दाखल न करण्याची भूमिका घेतल्याने उपस्थितांनी, पोलिसच जर तक्रार देण्यास धजावत नसतील तर सर्वसामान्यांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित केला.

दरम्यान, या प्रकरणी आडगाव पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचे चौकशीतून समोर आले. पुणे, नाशिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या वाहन निर्मिती कंपन्यांमधून पिक-अप वाहने घेऊन चालक निघतात; परंतु हे चालक मार्गस्थ होण्यापूर्वी नशा करतात.

मद्यपान करून वाहने चालवितात. शिवाय भरधाव वाहने नेतात. अशा वाहनचालकांची नाकाबंदीच्या ठिकाणी चौकशी व तपासणी करायला हवी, अशी मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT