nashik-pune highway esakal
नाशिक

नाशिक-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक-पुणे मार्गाने अनेक प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. पण याच मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जामचा सामना वाहनचालकांना व येथील रहिवाशांना करावा लागत आहे. (Traffic-jam-on-Nashik-Pune-road-everyday-marathi-news)

गेल्या वर्षभरापासून नाशिक-पुणे रस्त्याचे काम

गेल्या वर्षभरापासून हे काम सुरू असून पावसाळा सुरू झाला तरी या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही म्हणून जलद गतीने रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी सिन्नर फाटा येथील नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून नाशिक-पुणे रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक दिवस हे काम बंद होते. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्याच्या आत या रस्त्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र लॉक डाऊन कामगारांची कमतरता आणि ठेकेदाराच्या क्षमतेमुळे या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या नाशिक-पुणे रोडवर वाहतूक कोंडी रोज होत असते.

जीव मुठीत धरून प्रवास

सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येथे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे सध्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. येथील रहिवाशांनाही रस्ता ओलांडतांना त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली असून रस्त्याचे काम लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा राजकीय पक्षांतर्फे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT