grocery distribution to tribals esakal
नाशिक

आदिवासी विकास महामंडळातर्फे आदिवासी बांधवांना खावटी वाटप

कुणाल संत

नाशिक : राज्यातील लाभार्थी आदिवासी समाजबांधवांना खावटी अनुदान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील किराणामाल किटवाटप करण्यास आदिवासी विकास महामंडळाने सुरवात केली आहे. पावसाळ्यादरम्यान संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत असून, राज्यातील एक हजार २६४ लाभार्थ्यांना किटवाटप करण्यात आले आहे. (Tribal-corporation-distribute-grocery-to-tribal-nashik-marathi-news)

दुसऱ्या टप्प्यात किराणा मालाचे वाटप

कोरोनामुळे राज्यातील आदिवासी समाजबांधवांना आर्थिक हातभार लावण्याच्या दृष्टीने शासनाने खावटी अनुदान योजन पुनरुज्जीवित करत खावटीसाठी ४६४ कोटी रुपये मंजूर केले होते. राज्यातील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये रोख आणि दोन हजारांचा किराणामाल असे दोन टप्प्यात खावटीचे अनुदान वितरित करण्यात येणार होते. १ मेस पहिल्या टप्प्यात राज्यातील साडेदहा लाख लाभार्थ्यांना दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले होते. आता दुसऱ्या टप्प्यात किराणा मालाचे किटवाटप महामंडळाकडून सुरू आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयाची प्रतीक्षा

किराणा मालाचे किट राज्यातील सर्व शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून वाटप करावे. जेणेकरून लाभार्थ्यांना अडचण येणार नाही, यासाठी आदिवासी महामंडळाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांना प्रस्ताव दिला. मात्र, त्यावर पुरवठा विभागाकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने महामंडळाने आपलीच यंत्रणा वापरत किटवाटप करण्यास सुरवात केली आहे.

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून वितरण

किराणा मालवाटपासाठी राज्यातील २९ प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेले महामंडळ, आदिवासी विकास सोसायटींच्या ५२० गुदामांमध्ये पुरवठादाराकडून किट पुरविल्या जाणार आहेत. नंतर प्रकल्प अधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ते किट लाभार्थ्यांच्या ग्रामपंचायतपर्यंत पोचविली जाणार आहे आणि तिथून लाभार्थ्यांना किटवाटप होईल.

''राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील किराणामाल किटचा पुरवठा करण्यास महामंडळाकडून सुरू झाला आहे. पुढील तीन महिन्यांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.'' -नितीन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक

(Tribal-corporation-distribute-grocery-to-tribal-nashik-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

SCROLL FOR NEXT