Trimbakeshwar Temple esakal
नाशिक

Nashik Trimbakeshwar Mandir: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टचे उत्पन्न 25 कोटी

सकाळ वृत्तसेवा

Trimbakeshwar Mandir: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानात १ एप्रिल ते १ नोव्हेंबर या काळात श्रावण मास, अधिक मास, कार्तिक मासादरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. देणगी दर्शन तसेच देणगी पावतीच्या माध्यमातून देणगी स्वरूपात देवस्थानाकडे एकूण २५ कोटी दोन लाख ८५ हजार ४५९ रुपये जमा झाले.

देणगी दर्शनाच्या माध्यमातून १७ कोटी ६१ लाख ७२ हजार २००, तर देणगी पावतीच्या माध्यमातून एक कोटी ८२ लाख ८० हजार ६७२ रुपये जमा झाले आहेत. (Trimbakeshwar Devasthan Trust Income 25 Crores nashik news)

अधिक मास आणि श्रावण मास या दोन महिन्यांच्या कालावधीत पाच कोटींच्या दरम्यान देवस्थानास उत्पन्न प्राप्त झाले होते; परंतु स्वेच्छा देणगी दर्शन, दानपेटी व साधारण देणगी पावती अशा तिन्ही गोष्टींचे नियोजन विश्वस्त व व्यवस्थापक यांनी समतोल केल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होत आहे.

उत्तर दरवाजावर होणाऱ्या अधिक गर्दीचे नियोजन करण्यासाठी शिवनेरी धर्मशाळेच्या बाजूने स्वेच्छा देणगी दर्शन प्रवेशद्वार करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश एन. व्ही. जीवने यांच्या आदेशाने श्रावण मास, अधिक मास व कार्तिक मासदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले.

११ किलोचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा

कुशावर्त तीर्थावर दर सोमवारी दुपारी चारला पालखीतून निघणारा सुमारे सहा किलो सुवर्ण पंचमुखी मुकुट हा जवळपास २०० वर्षांपूर्वीचा आहे. स्थानिक भाविक-विश्वस्तांनी त्यात भर म्हणून ११ किलो वजनाचा व सोन्यात ११ महिने मुकुटासाठी सुवर्णदान स्वीकारण्याचे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

त्यात १३०.६३ ग्रॅम सोने, तसेच ११ लाख २४ हजार ६१६ रुपये देणगी मुकुटासाठी प्राप्त झाली आहे. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एन. व्ही. जीवने, सचिव तथा मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT