नाशिक

वीर गुर्जर सेनेच्या जळगाव

CD
(ही बातमी जागेनुसार कापता येईल) वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण (बोरखेडेकर, ह.मु. जळगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय पाटील (दगडीकर) तर जिल्हा सचिवपदी सुनील पाटील (विटनेरकर) यांची नियुक्ती करण्यात आली. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर, ह.मु. आळंदी) यांची वीर गुर्जर सेनेच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या वीर गुर्जर सेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून संघटनेचा विस्तार आणि समाजबांधवांच्या तक्रारींचे निवारण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर) होते. यावेळी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर), हरिभाऊ गुर्जर (वढोदेकर), वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील (वडनगरीकर), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर), तुषार चव्हाण (बोरखेडेकर), अजय गुर्जर (झुरखेडेकर), विजय पाटील (दगडीकर), सुनील पाटील (विटनेरकर) यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कवी प्रफुल्ल पाटील यांनी केले. --------- चौकट.. मुलगा, सुनेला समजून घेत कौटुंबिक प्रश्न सोडवावे बैठकीत समाजातील कौटुंबिक प्रश्न, बदलती सामाजिक परिस्थिती आणि कुटुंबातील नातेसंबंध यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लग्नानंतर मुलाच्या वागणुकीत बदल झाल्याची तक्रार अनेक कुटुंबांतून ऐकायला मिळते. मात्र, त्यामागील कारणांचा विचार न करता सुनेला दोष देण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. आई-वडिलांनी मुलगा आणि सुनेला समजून घेऊन कौटुंबिक प्रश्न संवादातून सोडविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. विवाहानंतर होणारे मतभेद आणि विभक्त होण्याच्या वाढत्या घटनांबाबतही चर्चा झाली. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT