bribe crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: वनविभागाचे दोघे लाचखोर ACBच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई न करता एक लाखांची लाच मागून, तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

शैलेंद्र आनंद झुटे (४८) असे वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे तर, साहेबराव बाजीराव महाजन (५४) असे वनरक्षकाचे नाव आहे. (Two forest department bribe takers arrested by ACB Nashik Bribe Crime)

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचे हॉटेल हयात दरबार हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करीत व्यवसाय करत असल्याचा आरोप दोघा संशयित लाचखोरांनी केला.

गत दहा वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने व पुढील दहा वर्षे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडीजोडीअंती ६० हजार व नंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर सापळा रचला.

संशयितांनी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना अटक केली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलिस नाईक विनोद चौधरी, गणेश निंबाळकर, पोलिस अंमलदार शितल सूर्यवंशी, चालक हवालदार परशुराम जाधव यांच्या पथकाने केली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT