नाशिक

युजीसी नेट परीक्षेच्‍या नोंदणीची २८ पर्यंत मुदत

CD
यूजीसी नेट परीक्षेच्‍या नोंदणीची २८ पर्यंत मुदत परीक्षेचे आयोजन १४ ते १९ डिसेंबरदरम्‍यान केले जाणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए)तर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यूजीसी-नेट डिसेंबर २०२६ परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेचे आयोजन येत्‍या १४ ते १९ डिसेंबरदरम्‍यान राष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २८ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल. यूजीसी-नेट ही परीक्षा देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) आणि सहायक प्राध्यापकपद, सहायक प्राध्यापकपद आणि पीएच.डी. प्रवेश तसेच केवळ पीएच.डी. प्रवेश यासाठी पात्र ठरविण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेचे आयोजन संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने एकूण ८७ विषयांसाठी केले जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्‍यक असणार आहे. नोंदणीची प्रक्रिया ८ ऑक्‍टोबरपासून सुरू झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांना २८ ऑक्‍टोबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येईल. नियमित शुल्‍क भरण्यासाठीदेखील हीच मुदत लागू राहणार आहे. विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत २९ ते ३१ ऑक्‍टोबर अशी असेल. दाखल अर्जांमधील अर्जामध्ये दुरुस्‍ती करण्यासाठी २ ते ४ नोव्‍हेंबरदरम्‍यान मुदत दिली जाईल. तर परीक्षेचे आयोजन १४ ते १९ डिसेंबरदरम्‍यान केले जाणार आहे. अर्ज दाखल केलेल्‍या परीक्षार्थींना त्‍यांच्‍या परीक्षेची तारीख, वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील प्रवेशपत्रावर उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी संकेतस्‍थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांनी फक्त एकच अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जातील संपर्कासाठी उमेदवारांनी स्वतःचा किंवा पालकांचाच सक्रिय ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक द्यावा, कारण पुढील सर्व संवाद याच माध्यमातून होईल. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘मेरी पहचान’ या सिंगल साइन-ऑन सुविधेचा वापर नोंदणीसाठी उपलब्ध केला आहे. नोंदणी आणि परीक्षा केंद्रावरील पडताळणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आधार व्हेरिफिकेशनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

SCROLL FOR NEXT