नाशिक

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

हर्षल गांगुर्डे

चांदवड (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे, पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. विजांच्या गडगडाटासह सुरु झालेल्या पावसाचा तडाखा सर्वांनाच जाणवू लागला आहे.

तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (ता. 09) सकाळी साडेसहा वाजता घडली. या घटनेत तरुण शेतकरी कैलास सूर्यभान कवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून पुढील पंचनामा सुरू आहे.

रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गहू, हरभरा, मका पिकांचे सुमारे साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्यातील एकुण परिस्थिती अशी -

* इगतपुरीत अवकाळी पावसाचा कहर. पहाटे चार पासून मेघगर्जनेसह धुव्वादार सुरू.

* घोटीसह परिसरात पहाटेपासून वीजेच्या कडकडाटसह अवकाळी पावसाची सुरुवात.

* सिन्नर तालुक्यात सकाळ पासून काही भागात रिमझिम पाऊस, विजांचा कडकडाट सुरू.

* मौजे सुकेने व कसबे सुकेने परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस.

* पालखेड, रानवड, नांदुर्डी (ता.निफाड) परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात.

* नैताळे परिसरात विजेच्या कडकडाट अन् वादळ- वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात. द्राक्ष, कांदा, गहु उत्पादक शेतकरी हवालदिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT