नाशिक

सामर्थ्य इनिशिएटिव्हचा शैक्षणिक किट वाटप उपक्रम स्तुत्य शिक्षणासाठीची गुंतवणूक ही उज्ज्वल भविष्याची पायाभरणी : प्रवीण नाना जाधव

CD
पान तीन ---------------- 13292 वणी: कर्मवीर दादासाहेब गायकवाड विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करताना प्रविण जाधव. शेजारी सागर गायकवाड आदी. शिक्षणातील गुंतवणूक ही उज्ज्वल भविष्याची पायाभरणी प्रवीण जाधव : वणीत वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २१ : शिक्षणासाठी केलेली गुंतवणूक हीच खऱ्या अर्थाने समाजाच्या उज्ज्वल व समृद्ध भविष्याची भक्कम पायाभरणी असते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केले. गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ''सामर्थ्य इनिशिएटिव्ह'' संस्थेच्या वतीने दिंडोरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर दादासाहेब गायकवाड विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जाधव बोलत होते. सामर्थ्य इनिशिएटिव्हचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे आणि समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहन केले. या वेळी त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांच्यातील मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्याम गवारे, सचिव रत्नाकर पगारे, मुख्याध्यापक श्री. शेजवळ, अभिषेक देशमुख, संग्राम देशमुख, निखिल साळुंखे, अमोल देशमुख, निखिल गवारे, अक्षय देशमुख, लीलाधर गडोजे, विष्णू लोखंडे, संदीप गुंजाळ, ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते. वसतीगृह अधीक्षक किशोर सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर अभिषेक देशमुख यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Admission : राज्यात बी. फार्मसी, फार्म.डी. प्रवेशाच्या चौथ्या फेरीत तीन हजार ६६७ विद्यार्थ्यांना संधी

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : शेतातून सोयाबीनची २० पाेती लंपास, ४८ हजारांचा माल चोरीला

SCROLL FOR NEXT