Vedanta & Foxconn News esakal
नाशिक

Vedanta-Foxconn Case : हजार लोकांना रोजगार देणारे 10 आउटलेट्स गुंडाळले

विक्रांत मते

नाशिक : जवळपास एक लाख लोकांना रोजगार मिळवून देणारा वेदांत-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला पळवून नेल्यानंतर महाराष्ट्रात उद्योजकांचे होणारे हाल आता समोर येत आहेत. नाशिक शहर व जिल्ह्यात एका प्रख्यात आउटलेट्स कंपनीने १३ आउटलेट टाकण्याचा निर्णय घेतला.

नाशिक शहरात तीन आउटलेट टाकल्यानंतर त्याचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळविण्यासाठी दीड वर्षापूर्वी कोटींच्या घरात रक्कम मागितल्याने संबंधित आउटलेट्स कंपनीने उर्वरित १० आउटलेटचा गाशा गुंडाळत नाशिकला राम राम ठोकला. यामुळे कंपनीचे काही नुकसान झाले नाही, मात्र जवळपास हजार लोकांना रोजगाराला मुकावे लागले. (Vedanta Foxconn Case 10 outlets employing thousands of people were closed nashik Latest Marathi News)

दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला व जवळपास एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा वेदांत-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना राज्याच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कुठे ना कुठे छोटे-मोठे प्रकल्प अन्य ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे प्रकार आता समोर येत आहेत.

अनेक ठिकाणी युनियनबाजी व हप्तेखोरीमुळे प्रकल्प टाकण्यास उद्योजक घाबरतात. जसे राजकीय पक्ष व संघटनांची दादागिरी उद्योग क्षेत्रात चालते तशाच प्रकारच्या अनेक अडचणी शासकीय पातळीवरूनदेखील निर्माण होतात. वेदांत फॉक्सकॉनच्या प्रकारानंतर सोशल मीडियावर उद्योजक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.

अशाच एका संतप्त भावनेतून नाशिकमधून एका मार्केटिंग आउटलेट्स कंपनीने आउटलेटची संख्या कमी करून प्रकल्प गुंडाळल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरासह ग्रामीण भागात संबंधित कंपनीला १३ आउटलेट टाकायचे होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तजवीज करण्यात आली. नाशिक शहरात विल्होळी नाका, आडगाव, तसेच वडाळा शिवारात तीन आउटलेट्स उभारल्यानंतर महापालिकेकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करून घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला.

मात्र, दाखला देण्यासाठी मोठी रक्कम मागण्यात आल्याने प्रशासकीय पातळीवर निर्माण झालेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या अडथळ्यांचा विचार करून संबंधित आउटलेट्स कंपनीने ग्रामीण भागात उभारले जाणारे १० आउटलेट्स रद्द करण्याचा निर्णय घेतला.

हजार लोकांचा रोजगार बुडाला

एका आउटलेटच्या माध्यमातून शंभर लोकांना रोजगार प्राप्त होणार होता. दहा आउटलेट्स रद्द झाल्याने जवळपास एक हजार लोकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे वेदांत निमित्त असले तरी असे प्रकार राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात नित्याचे झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

"प्रस्तावित आउटलेट्स कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. या कंपनीला प्रशासकीय काम कामकाजाचा वाईट अनुभव आला. त्यामुळे प्रकल्पांचा विस्तार थांबविण्यात आला. शहराच्या विकासासाठी ही बाब धोकादायक असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले."

-देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT