नाशिक

नेहरु चौक मित्र मंडळातर्फे शस्त्रपूजन विधी उत्साहात

CD
NSK26H33092 जळगाव : नेहरु चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त मंगळवारी ध्वज व शस्त्रपूजन विधी उत्साहात पार पडला, त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर. ------ नेहरु चौक मित्र मंडळातर्फे शस्त्रपूजन विधी उत्साहात उपशीर्षक मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : नेहरू चौक मित्र मंडळातर्फे मंगळवारी (ता.२०) विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्रपूजन व ध्वजपूजन सोहळा उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडला. शस्त्रपूजन परंपरेचे मंडळाचे हे यंदाचे ४३ वे वर्षे होते. सुरुवातीला ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मान्यवरांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी ध्वजस्तंभाचे पूजन करून उपस्थितांना व परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विजयादशमीनिमित्त ही ऐतिहासिक परंपरा सातत्याने जोपासण्याचे कौतुकास्पद काम केल्याबद्दल सर्वच मान्यवरांनी नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचे विशेष आभार मानले व कौतुक केले. या सोहळ्यास खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (उर्फ राजूमामा), महापौर दीपमाला काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी विजय मोघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक सागर सोनवणे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, केशव स्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, ॲड. विपिन पाटील, दिलीप गांधी, शैलेश ठाकरे, संदीप रडे, अतुल हाडा आणि नेहरू चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : नारायण गडावरील मनोज जरांगेंच्या मेळाव्याला तुफान गर्दी; विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर?

SCROLL FOR NEXT