विजयादशमीनिमित्त संघाचे
शहरात सघोष पथसंचलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१९ : विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये मंगळवारी (ता. २०) भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक गणवेशात, दंडधारी स्वयंसेवकांच्या सहभागातून होणाऱ्या या संचलनात संघशक्ती, शिस्त आणि एकात्मतेचे दर्शन घडणार आहे.
शहरातील
इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, सिडको, पंचवटी, भोसला परिसर आणि सातपूरसह शहरातील विविध नगरांमध्ये हे संचलन होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण व्यावसायिक तसेच प्रौढ शाखांतील स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.इंदिरानगरमधील मोदकेश्वर नगराचे संचलन सकाळी साडेसातला अशोका मार्गावरील श्री गणेशबाबा मंदिरातून सुरू होईल. यात सुमारे ४०० दंडधारी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. उपनगरातील संचलन सकाळी ७.२०ला सुभेदार रामजी सभागृहातून सुरू होईल. पवननगर येथे सकाळी साडेसातला डॉ. हेडगेवार मैदानातून, तर अंबड नगरात सकाळी नऊला छत्रपती संभाजी स्टेडियम येथून संचलनाला प्रारंभ होईल.
जुने सिडको, पंचवटी, सावरकर नगर, टिळक नगर, सोमेश्वर नगर आणि सातपूर येथेही नियोजित मार्गांवरून पथसंचलन काढण्यात येणार आहे. गुरुगोविंदसिंह नगरात पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्समधून दुपारी साडेचारलासंचलन निघेल. तर टिळक नगर आणि सोमेश्वर नगरातील संचलन सायंकाळी चारला सुरू होईल. दरम्यान, राष्ट्र सेविका समितीतर्फे रविवारी (ता. २५) सकाळी कॉलेज रोड परिसरातील एच.पी.टी. आणि आर.वाय.के. महाविद्यालयाच्या मैदानावर सघोष पथसंचलन होणार आहे. यासाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.