महिलांना मारहाणीचा
तिघांवर गुन्हा दाखल
शिरपूर : घर बांधकामाच्या वादातून दोन महिलांना मारहाण करुन गंभीर जखमी केल्याच्या संशयावरुन तीन जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीची घटना १२ ऑक्टोबरला बोराडी (ता. शिरपूर) येथील हरिपुरानगरमध्ये घडली होती. सखूबाई मोतीराम गोपाळ (वय ७५, रा. बोराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना संशयितांनी सेंट्रींग कामाचा लोखंडी रॉड उचलून मारहाण केली. तर तिची सून आशाबाई राजेंद्र गोपाळ हिला विटेने मारहाण केली. संशयित पंकज चिंतामण गोपाळ, अनिल चिंतामण गोपाळ व पमाबाई चिंतामण गोपाळ (सर्व रा.बोराडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार सागर ठाकूर तपास करीत आहेत.
शिरपूर येथून
गुटखा जप्त
शिरपूर : शहरातील महाविद्यालयासमोर पुरुषाकडून ४८ हजार ४०० रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करुन जप्त केला. संजय खटनमल माखिजा (वय ४१, रा. आकाश गार्डनजवळ, कृष्णा नगर, शिरपूर) असे संशयिताचे नाव आहे. १३ ऑक्टोबरला दुपारी पावणेचारला तो एसपीडीएम महाविद्यालयासमोरुन जात असतांना ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर पिशवीमध्ये विमल पान मसाल्याची २२० पाकिटे व विमल तंबाखूची २०० पाकिटे असा मुद्देमाल आढळला. अन्न सुरक्षा अधिकारी अभिजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक वर्षा पाटील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.