नाशिक

समाजाच्या कौशल्याला आधुनिक

CD
ॲंकर ---------- NSK26H33542 जळगाव : विश्वकर्मा वंशीय समाजाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. शेजारी मान्यवर. --------- कौशल्याला आधुनिक शिक्षणाची जोड द्या ------ पालकमंत्री गुलाबराव पाटील : विश्वकर्मावंशीय समाजाच्या जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२५ : विश्वकर्मा समाजाला कष्टाची, कलेची व कौशल्याची मोठी परंपरा लाभली आहे. या समाजाच्या हातात कौशल्य आहे, आता त्या कौशल्याला आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान व उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. आपल्या मुलांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनले पाहिजे. मुलांच्या हातात पदवी पाहण्यासाठी आई-वडिलांचे हात आयुष्यभर राबत असतात. त्यांच्या कष्टांचे चीज करण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे. समाज किती मोठा आहे, यापेक्षा समाजातील किती कुटुंबे प्रगती करीत आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण, संघटन व आर्थिक स्वावलंबनाची कास धरा, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. येथील एका हॉटेलमध्ये विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे रविवारी (ता.२५) आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा व समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न, उद्योगरत्न व समाजभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. शैक्षणिक व विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविणाऱ्या ८० गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, पारंपरिक व्यवसायाचा अभिमान बाळगत नव्या संधी स्वीकारल्या पाहिजेत. मुलींच्या शिक्षणालाही प्राधान्य द्या. आज ज्यांचा सत्कार होत आहे, त्यांच्यातील अनेकांनी उद्या उद्योजक म्हणून याच मंचावर सन्मान मिळवावा. यावेळी संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ (परभणी), नाशिक येथील सूर्या ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद सूर्यवंशी व विजय मिस्तरी (पारोळा) सुभाष वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. विशेषतः तरुणांनी उद्योजकतेकडे वळण्यासाठी उद्योगक्षेत्रातील संधी व अनुभवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शहराध्यक्ष प्रशांत राऊत, युवा शहराध्यक्ष नीलेश खैरनार, शहर सचिव सुरेश जाधव, रवींद्र जंजाळकर, मनोज जाधव, सागर जाधव, वैभव दांडेकर, धनराज रुले यांच्यासह जिल्हाभरातील विश्वकर्मा समाजबांधव उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सचिव प्रवीण शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक भागवत रूले यांनी केले. यशस्वी आयोजन व नियोजन राज्य उपाध्यक्ष भगवान वाघ यांनी केले. ---------- या आधारस्तंभांचा झाला सन्मान विश्वकर्मा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यात समाजरत्न उद्योगरत्न पुरस्काराने नाशिक येथील सूर्या ग्रुपचे एम. डी. आनंद सूर्यवंशी, तर समाजभूषण पुरस्काराने प्रा. नागोराव पांचाळ व एम. टी. लुले, सामाजिक पुरस्कार प्रवीण सुतार (पारोळा) व सुभाष वाडेकर (धुळे), उद्योजक पराग अहिरे(धुळे) व उद्योजक संजय हिरे (भुसावळ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT