Flood at Waghadi River esakal
नाशिक

Rain Update: म्हसरूळ भागात जोरदार पावसाने वाघाडीला पूर; व्यावसायिकांची पळापळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोमवारी (ता. १०) दुपारी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने पादचाऱ्यांसह व्यावसायिकांची चांगलीच पळापळ झाली. म्हसरूळ भागात झालेल्या जोरदार पावसानंतर वरुणेच्या (वाघाडी) पाणीपातळीत मोठी वाढ झाली. त्यामुळे गंगाघाटावरील व्यावसायिकांसह रस्त्याने जाणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. (Waghadi floods due to heavy rain in Mhasrul area Nashik Latest Marathi News)

गत दोन महिने थैमान घातलेल्या पावसानंतर गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या परतीच्या पावसाने वरुणेच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन ते पाणी थेट वाघाडीची संरक्षक भिंत ओलांडून म्हसोबा पटांगणावर पसरले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहने उभी केली जातात. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही या ठिकाणी जास्त आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या या जोरदार पावसानंतर वाघाडीला मोठा पूर आला.

त्यानंतर पुराचे हे पाणी संरक्षक भिंत ओलांडून थेट म्हसोबा व मरिमाता पटांगणावर पोचले. अचानक आलेल्या या पावसानंतर नागरिकांसह येथे व्यवसाय करणारे व्यावसायिक, वाहनधारकांची पळापळ झाली. त्यामुळे वर्दळीच्या या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. या पुराने दिवाळीसाठी विक्रीसाठी केरसुण्या घेऊन आलेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रात्री उशिरा येथील पाणीपातळी कमी झाल्यावर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

SCROLL FOR NEXT