नाशिक

सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविणारा वणीचा ऐतिहासिक दसरा उत्साहात देशमुख-थोरात कुटुंबीयांच्या परंपरेला ग्रामस्थांची साथ; आपट्याच्या पानांची लयलूट

CD
VNI26B13281 वणी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीमोल्लंघन करुन आपट्यांच्या पानांची लयलुट करतांना ग्रामस्थ ------------------- ३६-४ वणीतील ऐतिहासिक दसरा पारपरिक उत्साहात देशमुख- थोरात कुटुंबीयांच्या परंपरेला ग्रामस्थांची साथ; आपट्याच्या पानांची लयलूट सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२० : विजयादशमीनिमित्त सर्वधर्म समभावाची परंपरा जपणारा वणी येथील शेकडो वर्षांची ऐतिहासिक दसरा उत्सव व सीमोल्लंघन सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने उत्साहात पार पडला. संबळ- तुतारीचा निनाद, सवाद्य पालखी मिरवणूक आणि विविध समाजबांधवांचा सहभाग अशा भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात ग्रामस्थांनी आपट्याच्या पानांची (सोन्याची) लयलूट करीत एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. वणीतील ऐतिहासिक परंपरेनुसार देशमुख व थोरात कुटुंबीय व ग्रामस्थांतर्फे दसरा उत्सव व सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त देशमुख वाड्यातून सायंकाळी पाचच्या सुमारास श्री जगदंबा देवी व खंडोबा महाराज यांच्या पालखीची पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संबळ व तुतारीच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ सहभागी झाले होते. मिरवणूक शिवनेरी चौकात आल्यानंतर जैन व विश्वकर्मा समाजबांधवांनी सहभाग घेतला. संताजी चौकात तेली समाजबांधवांनी पालखीचे स्वागत केले. शिंपी गल्लीत क्षत्रिय शिंपी समाजातर्फे खंडोबा महाराजांच्या पालखीला परंपरेनुसार मिरवणुकीत सहभागी करून घेण्यात आले. मस्जिद चौकात काजी परिवारासह मुस्लिम बांधवांना सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले. याशिवाय खांडे गल्ली, देवी मंदिर चौक, कुंभार गल्ली, पंचाळ गल्ली, कोळीवाडा, पिंपळगाव रस्ता व राजवाडा मार्गे मिरवणूक पुढे सरकली. विविध जाती-धर्मांतील नागरिकांच्या सहभागामुळे वणीच्या सामाजिक एकोपा आणि सर्वधर्म समभावाच्या परंपरेचे दर्शन घडले. मिरवणूक जुन्या बसस्थानकाजवळ विसाव्यासाठी थांबल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीमोल्लंघनाचा मुख्य विधी पार पडला. येथे आपट्याच्या झाडाची वैदिक पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी आपट्याची पाने एकमेकांना देत सोन्याची लयलूट केली. यानंतर देशमुख परिवारातील देवी पालखीचे मानकरी सुरेश देशमुख व अजिंक्य देशमुख यांच्या हस्ते चंद्रभान या पारंपरिक हत्याराने कोहळ्यावर वार करून प्रतीकात्मक बळी देण्याचा विधी पार पडला. पुढे श्री जगदंबा देवी व खंडोबा महाराज यांच्या पालखीतील मूर्ती जगदंबा देवीच्या भेटीस नेण्यात आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आपट्याची पाने एकमेकांना देत परस्परांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक सलोखा यांचा संगम असलेला वणीचा हा ऐतिहासिक दसरा उत्सव यंदाही उत्साहात साजरा झाला. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT