प्रभाग नऊमध्ये सणासुदीलाच पाण्यासाठी वणवण
पुरवठा सुरळीत न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
सातपूर, ता. १२ : प्रभाग क्रमांक ९ परिसरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, कमी दाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याने परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला असून, पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. गंगासागरनगर, कडेपठार चौक, आयटीआय कॉलनी परिसरात काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असल्याने घरगुती वापरासाठी आवश्यक पाणीसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. काही वेळा आवश्यक पाणी मिळत नसल्याने इतर ठिकाणांहून पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. टँकरने पाणी मागवावे लागत आहे. सणासुदीच्या काळात घरातील स्वच्छता आणि इतर दैनंदिन कामांसाठी पाण्याची गरज वाढलेली असताना कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरातील महिलांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.
---चौकट
केवळ पाहणी
तक्रारीनंतर अधिकारी परिसरात येऊन पाहणी करतात आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नियमित व मुबलक पाणीपुरवठा करावा. येत्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर परिसरातील जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कमल इंगळे, मंदा भगत, कावेरी शेवाळे, आशा महाजन, अरुणा भगत, वंदना महाजन, मनीषा अहिरे, रेखा आहेर, मुक्ता अहिरे, शोभा पवार, कल्पना श्यामसुंदर आदींनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.