‘वारी’च्या कलावंतांचा महावितरणकडून सत्कार
जळगाव परिमंडलाचे नाट्य स्पर्धेत विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या जळगाव परिमंडलाच्या ‘वारी’ नाटकातील कलावंत आणि तंत्रज्ञांचा मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी सत्कार करण्यात आला.
मुख्य अभियंता मुलाणी हे ‘वारी’ नाटकाचे निर्माते, तर अधीक्षक अभियंता मदन सांगळे सहनिर्माते आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड आणि जळगाव परिमंडलांनी सहभाग घेतला होता. डॉ. समीर मोने लिखित आणि सागर सदावर्ते दिग्दर्शित ‘वारी’ नाटकाने आशयघन कथानक, प्रभावी अभिनय, कल्पक नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताच्या जोरावर विजेतेपद मिळवले. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत तसेच रंगभूषा व वेशभूषा या विभागांत जळगावच्या संघाने प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळवली.
अभिनयात राहुल निकम यांना द्वितीय, तर दीपाली नरवाडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी आणि गीतार्थ भोळे यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरविण्यात आले.
चौकट
कलावंतांची मेहनत अन् सांघिक कामगिरी
यावेळी मुलाणी यांनी कलावंतांच्या मेहनतीचे आणि सांघिक कामगिरीचे कौतुक केले. अंतिम फेरीतही उत्कृष्ट सादरीकरण करून जळगाव परिमंडलाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता मदन सांगळे, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.