नाशिक

जलसेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांना ३.३१ लाखांचा पाणी परतावा

CD
YEO26B27141 येवला : शेतकऱ्यांना पाणी परताव्याचे धनादेश देताना जलसंपदा विभागाचे अधिकारी. ----------------- शेतकऱ्यांना ३.३१ लाखांचा पाणी परतावा येवल्यात धनादेश वितरण : योग्य पाणी नियोजनाचा जलसंपदा विभागाचा संदेश ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : अल्-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व ओळखून उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे, सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालखेड पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांनी केले. जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या जलसेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील पात्र पाणी वापर संस्थांना पाणी परतावा प्रदान करण्यासाठी येथील पालखेड पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात कार्यक्रमात ते बोलत होते. उपस्थित शेतकऱ्यांना तीन लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमात पाणी वापर संस्थांनी आवर्तन काळात पाण्याचे योग्य नियोजन करणे, सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करणे, संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण करून घेणे तसेच आवश्यक दप्तर अद्ययावत ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाणीपट्टी वसुली करून ती शासनाकडे वेळेत जमा केल्यास अतिरिक्त दंड टाळता येईल. तसेच नियमानुसार पाणी परताव्याचा लाभ घेता येईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले. जलसिंचन शाखा अंदरसूल (रब्बी) चे शाखाधिकारी हेमराज खैरनार यांनी पाणी वापर संस्था आणि लाभधारक शेतकरी यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच पाण्याच्या नियोजनासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. पश्चिमचे शाखाधिकारी अमोल सुरडकर यांनी पाणी बचतीचे आवाहन केले. एरंडगावचे शाखाधिकारी मिलिंद पगार यांनी आभार मानले. येथील पालखेड पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ कार्यालयातील सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

राजेंद्र शिंदे उर्फ राजा खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर?

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

SCROLL FOR NEXT