murder esakal
नाशिक

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

संदिप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : देहेरेवाडी (ता. दिंडोरी) येथील खुनाचा उलगडा लावण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले असून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.

देहरेवाडी ते राशेगाव रस्त्यालगत झालेल्या पिंपळगाव बसवंत येथील खुनाच्या गुन्ह्याची दिंडोरी पोलिसांनी उकल केली आहे. मृत अनिल झेंडफळे याच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित म्हणून पत्नी व तिचा प्रियकराला अटक करण्यात आली होती. हा खून करून आत्महत्या भासविण्याचा प्रकार २ जूनला देहरेवाडी ते रासेगाव रोडवर उघड झाला होता.

पोलिसांनी घटनेबाबत तपास केला असता मृताची पत्नी सुनिता अनिल झेंडफळे हिचे दीपक दत्तू गवे (रा. रवळगाव, ता. दिंडोरी (ह. मु. पालखेड बंधारा, ता. दिंडोरी) याच्याशी सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते. अनिल झेंडफळे हा पत्नी सुनिता हिस दारू पिऊन त्रास देतो व वेड्यासारखा वागतो म्हणून दीपक गवे व सुनीता झेंडफळे यांनी संगनमत करून दोन जूनच्या रात्री देहरेवाडी, खैराडी शिवारात दारू पाजून घेऊन जात देहरेवाडी ते राशेगाव रस्त्यालगत अनिलच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून ठार मारले.

मृतदेह नष्ट करण्याच्या हेतूने रस्त्याच्या कडेला फेकून दिले. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी फोनच्या कॉल डिटेलच्या माहितीआधारे खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांनीच खून केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलिस नाईक धनंजय शिलावटे, बाळा पानसरे, संदीप कडाळे, युवराज खांडवी यांच्या पथकाने तपास करीत संशयितांना गजाआड केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT