Injured farmer Gorakh Jadhav. esakal
नाशिक

Nashik : रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

योगेश सोनवणे

पिंपळगाव (जि. नाशिक) : येथील देवदारेश्वर शिवारात शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने (Wild Pig) हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गोरख माधवराव जाधव असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. गोरख जाधव यांची देवदारेश्वर शिवारात शेती आहे. (wild pig attack on farmer at pimpalgaon nashik news)

बुधवारी सायंकाळी शेतीचे काम करीत असताना रानडुकराने जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी शेतकऱ्यास देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र जखम मोठी असल्यामुळे जाधव यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास देवळा वन विभाग करीत असून, आर्थिक मदतीची मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात लावलेले पीक नष्ट करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे, अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरांमुळे होत असून, वन विभागाने याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT