Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: फुले महामंडळाच्या महिला लिपिकाला अटक; 2 हजारांची लाच घेताना केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुणे रोडवरील नासर्डी पुलानजिक असलेल्या महात्मा फुले महामंडळातील कनिष्ठ महिला लिपीकास दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

छाया विनायक पवार (५२, रा. नाशिक) असे लाचखाेर महिला लिपीकाचे नाव आहे. (Woman Clerk of Phule Corporation Arrested Action taken while taking bribe of 2 thousand Nashik Crime)

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाचे नावे महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी २ लाख १६ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर कर्जाचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी लाचखोर छाया पवार यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली असता, विभागाने सापळा रचला. त्यानुसार सामाजिक न्याय भवन येथील कार्यालयात मंगळवारी (ता.१२) तक्रारदाराकडून तडजोड करून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना छाया पवार हिस दबा धरून असलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजित जाधव, हवालदार प्रणय इंगळे, ज्योती शार्दुल, अनिल गांगुर्डे व चालक परशूराम नाईक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT