Railway Police Sakal
नाशिक

धावत्या रेल्वेतील महिलेच्या प्रसूतीसाठी पोलिसांची धावपळ

पोपट गवांदे

या कठीण प्रसंगात रेल्वे पोलिसांनी केलेली धावपळ पाहून माणुसकीचा झरा अजून जिवंत असल्याचे बोलले जात आहे.

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : सध्या कोरोना (Coronavirus) महामारीमुळे देशभरात मृत्यूचे तांडव सुरु आहे या कठीण काळात बरेच जण स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करताना दिसत आहेत. दरम्यान मुंबई-देवगिरी एक्स्प्रेसमधून (Mumbai - Devgiri Express) प्रवास करणाऱ्या महिलेच्या प्रसूतीसाठी इगतपुरी रेल्वे पोलिसांनी वेळीच धावपळ केल्याने महिलेची सुखरूप प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली. (woman gave birth safely after the railway police helped her)

या कठीण प्रसंगात रेल्वे पोलिसांनी केलेली धावपळ पाहून माणुसकीचा झरा अजून जिवंत असल्याचे बोलले जात आहे. महिला आणि नवजात बाळ सुरक्षित असून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

काय घडले?

रविवारी (ता.३०) रात्री परभणी येथे राहणारे कैलास पवार हे आपली गरोदर पत्नी रेखा पवार यांच्यासह मुंबई देवगिरी एक्स्प्रेसने मूळ गावी परभणी येथे जात होते. मध्यरात्री इगतपुरी रेल्वे स्थानकात रेखा पवार यांना अचानक प्रसूती कळा सुरु झाल्या. वेदना असह्य होत असल्याची बाब रेल्वे सुरक्षा बलाचे सत्यसुधन त्रिपाठी व सचिन नागदेवते, प्रमोद आहाके, सतीश खर्डे यांनी समजली. त्यांनी तातडीने रेखा पवार यांना सरकारी वाहनाने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे कोविड सेंटर असल्याने तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्रसूती सुखरूप झाली.
. (woman gave birth safely after the railway police helped her)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

Latest Marathi News Live Update: बालिंगा कचरा डेपोला आग; धुरामुळे ग्रामस्थ हैराण!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

SCROLL FOR NEXT