lightning strike esakal
नाशिक

चारा घेण्यासाठी गेलेल्या महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी

महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील बिस्टा किल्ल्याच्या पायथ्यालगत जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. अश्विनी सुनिल वाघ असे महिलेचे नाव असून नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय आधिकारी डाॅ. सागर पाटिल यांनी सांगितले.

कोटबेल शिवारातील नळी धरणानजीक तीन ते चार महिला जनावरांना चारा घेण्यासाठी बिजोटे शिवारातील बिस्टा किल्याच्या पायथ्यालगत गेल्या होत्या, मात्र दुपारनंतर अडीचच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाल्याने डोंगरा लगतच्या झाडाखाली संबधित महिलांनी आश्रय घेतला होता. काही वेळातच वीजेचा कडकडाटाचा मोठा आवाज झाल्याने महिला घाबरल्या होत्या त्यातीलच अश्विनी सुनिल वाघ (वय, २६) या महिलेला वीज चाटून गेल्याने जखमी झाली. महिलांनी मोठ्या आवाजात आरडाओरड केल्याने शेतातील वाघूर बसवलेले मेंढपाळ व शेतकऱ्यांनी धाव घेतली व संबंधित महिलेला नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी झाली नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून. वैद्यकीय आधिकारी डाॅ. सागर पाटिल यांनी सदर महिलेची तपासणी करून तब्येत स्थिर असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT