मेनफिचर''
शहर टुडे पान तीनसाठी
----------
लोगो : आम्ही साऱ्या जणी
---------------------
NSK26H32917
जळगाव : सकाळ माध्यम समूहाच्या ‘आम्ही साऱ्या जणी’ या उपक्रमात सहभागी भरारी फाउंडेशनच्या पदाधिकारी.
--------------------------
शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरणाचा ध्यास
-------
भरारी फाउंडेशनकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१८ : पर्यावरणाचे संवर्धन, पाण्याचे संरक्षण, वंचित विद्यार्थ्यांचे शिक्षण, युवकांसाठी रोजगारनिर्मिती, शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण या माध्यमांतून समाजातील गरजू घटकांना स्वावलंबी बनविणे, हाच भरारी फाउंडेशनच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. समाजासाठी कार्य, गरजूंसाठी आधार व प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची संधी देणे, हाच भरारी फाउंडेशनचा अनेक वर्षांपासूनचा प्रवास
असल्याची माहिती भरारी फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्या जणी’ या उपक्रमात दिली.
महिला होताहेत आत्मनिर्भर
प्रा. चित्रा चौधरी (अध्यक्षा, भरारी फाउंडेशन) : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी २०१४पासून शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ४५०हून अधिक मुला-मुलींना शालेय व उच्चशिक्षणासाठी मदत करण्यात आली. शेतकरी आत्महत्येमुळे कुटुंबाचा आधार गमावलेल्या महिलांना त्यांच्याच गावात रोजगार मिळावा व त्या स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने शिलाई यंत्र, पिकोफॉल मशीन, गाय, म्हैस, बैल व शेतीपूरक व्यवसायांसाठी मदत करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून १०७हून अधिक महिला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने सक्षम झाल्या. स्थानिक लघुउद्योजिका, महिला उद्योजक व ग्रामीण भागातील कौशल्याधारित व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांचे उद्योग उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-------
अनेक वृक्षांची लागवड
शैला चौधरी : भरारी फाउंडेशनची स्थापना २००९मध्ये झाली. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, रोजगारनिर्मिती व शेतकरी कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने संस्थेच्या कार्याची सुरुवात वृक्षारोपणापासून झाली. आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ७००हून अधिक महिला बचत गटांना आपली उत्पादने विक्रीसाठी दालन व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या उत्पादनांची मागणी वाढावी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे, यासाठी महोत्सव असतो.
-------------
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
चारूलता महाजन : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून संगणक व व्यावसायिक कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातून ३४०हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या आयुष्यात स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निर्माण करण्यात आला. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने १३ मुलींचे विवाह लावून दिली. शिवाय त्यांच्या संसाराची नव्याने सुरुवात व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात पुढे करण्यात आला.
-------------
महिलांना सन्मान मिळाला
सुनंदा मोझे (सचिव, भरारी फाउंडेशन) : महिलांना मदत मिळावी, सन्मान मिळावा, युवती व महिलांना कलागुण सादर करण्याची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. विधवा महिलांना रोजगाराची संधी मिळवून देतो. बहिणाबाई महोत्सव हा महिला सक्षमीकरणाचा मंच आहे. जो आम्ही दरवर्षी भरवितो. शेतकरी आत्महत्यग्रस्त कुटुंबांना शेतीची औजारे मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
-------------
सामाजिक उपक्रमाचे समाधान
अर्चना जाधव : कोविड काळात आम्ही भरपूर कार्य केले. मोफत किराणा वाटप, मास्क वाटप केले. निराधार झालेल्या मुलांना काम मिळवून दिले. रुग्णांना त्वरित उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी मदत केली. गरजूंना मोफत वह्या, पुस्तके वाटप करतो. महिलांसाठी वर्षभर कार्य सुरू असते. सामाजिक उपक्रमामुळे समाजाला मदत केल्याचे समाधान आहे.
-------
कलागुणांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले
दीपाली महाजन : भरारी फाउंडेशनमुळे मला अनेक कलागुणांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता आले. अनेक खाद्यपदार्थ बनविणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा यात सहभागी होता आले. महिलांसाठी एक खुले व्यासपीठ असल्याने सर्वांना समान संधी या ठिकाणी मिळते.
-------------
परंपरा, उत्सव टिकविण्याचा प्रयत्न
शुभांगी चौधरी : धकाधकीच्या जीवनात अनेक रुढी, परंपरा, उत्सव आपण मागे टाकत चाललो आहोत. आमचा हा गृप गेल्या अनेक वर्षांपासून भुलाबाई उत्सव, चैत्रगौर साजरी करतो. यात फक्त महिलांना त्यांच्या कलागुणांना सादर करता येते. त्यामुळे महिला आनंदाने यात सहभागी होऊन बक्षिसेही मिळवितात. मी दोन महिला बचत गट चालविते. त्यामुळे महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते.
----------
रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जागृती
सरला वाणी : जळगाव शहराची भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या विचारांतून २०१३मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान सुरू करण्यात आले. पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण याबाबत जनजागृती करण्यात आली. दहा वर्षांच्या कालावधीत एक हजार ८००हून अधिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरांवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसविली.
-----------
खूप शिकायला मिळाले
रोहिणी बडगुजर : भरारी फाउंडेशनमध्ये येऊन खूप काही शिकायला मिळाले. रेसीपी, नृत्य, गाणी सादर करण्यास चांगला मंच मिळाला आहे. महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाला यातून संधी मिळते.
--------------
सामाजिक कार्याची संधी
माधुरी जावळे : सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळते. याचा आनंद आहे. सर्व महिला एकमेकींना सांभाळून घेत एकमेकींचे सुखदुख शेअर करतात. त्यामुळे मन मोकळं करता येते. मला शैला चौधरींनी मोठा मानसिक आधार दिला. भरारी फाउंडेशनने कलागुणांना संधी दिली आहे.
---------
कलागुणांना संधी मिळाली
जान्हवी महाजन : भरारी फाउंडेशनमध्ये आमच्या कलागुणांना संधी मिळाली. मोठा मंच यानिमित्ताने उपलब्ध झाला. युवतींसाठी हे फाउंडेशन मोलाचे मार्गदर्शक आहे. अनेक महिलांना कर्तृत्वाची संधी यानिमित्ताने मिळाली. अनेकींना रोजगारही मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.