नाशिक

नगरपंचायत क्षेत्रातील ९३३ महिला शेतकऱ्यांना सन्मान प्रमाणपत्र देण्याबाबत ठराव मंजूर

CD
(मेन बातमीजवळ घेणे) SKD26B04358 शिंदखेडा : महिला शेतकरी सक्षमीकरणाबाबत माहिती देताना मंडल कृषी अधिकारी गणेश महाले. ------ महिला शेतकऱ्यांना सन्मान प्रमाणपत्र नगरपंचायतीच्या क्षेत्रासाठी ठराव मंजूर सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १५ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महिला शेतकरी दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरपंचायत क्षेत्रातील महिला शेतकऱ्यांना सन्मान व अधिकृत मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम : २०२६ अंतर्गत पात्र महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी म्हणून मान्यता देऊन सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबतचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. शिंदखेडा नगरपंचायत क्षेत्रातील एकूण ९३३ महिला शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांची नियमानुसार पडताळणी करून पात्र महिला शेतकऱ्यांना सन्मान प्रमाणपत्र देण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. महिला शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रातील योगदानाची दखल घेणे, त्यांना सन्मानाची व अधिकृत ओळख मिळवून देणे, शासनाच्या विविध कृषी व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या ठरावाचा प्रमुख उद्देश आहे. महिला शेतकरी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधार असून, शेतीच्या विविध कामांमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेस नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, मंडल कृषी अधिकारी गणेश महाले, वरिष्ठ लिपिक विवेक डांगरीकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT