NSK26H33547
जळगाव : जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना नंदिनीबाई वामनराव मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी.
---------
कारागृहातील महिलाबंदीशी
विद्यार्थिनींनी साधला संवाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२५ : येथील नंदिनीबाई वामनराव मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी जिल्हा कारागृहाला भेट देत महिला बंदींशी संवाद साधला. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी महिला बंदींची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेत त्यांच्या भावविश्वाचा जवळून परिचय करून घेतला.
कारागृहातील महिला बॅरेकमध्ये प्रवेश केल्यानंतर विद्यार्थिनींनी महिला बंदींशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या जीवनातील अडचणी समजून घेताना विद्यार्थिनींनी विविध प्रश्न उपस्थित केले. या संवादातून त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या, समाजातील विविध परिस्थितींचा व्यक्तीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याची जाणीव विद्यार्थिनींना झाली. प्रास्ताविकात समाजशास्त्र विभागाचे डॉ. डी. यू. राठोड यांनी व्यक्तीच्या हातून झालेल्या चुका सुधारून वर्तमानातील चांगल्या कृतींच्या माध्यमातून भविष्य सुंदर करता येते, असे सांगितले. कारागृह वर्ग दोनचे अधीक्षक प्रकाशसिंग परदेशी यांनी विद्यार्थिनींना कारागृहाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. कारागृहातील व्यवस्था, नियम व दैनंदिन कामकाजासोबतच विद्यार्थिनींच्या शंकांचेही त्यांनी निरसन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या बी. एस. राणे होत्या. उपप्राचार्या एस. एस. नेमाडे यांनी आभार मानले. प्रशासनाधिकारी चव्हाण, साहेबराव चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्यासह कारागृह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संगीता पाटील, प्रा. व्ही. एम. जोगी, प्रा. डी. एम. बारी व शिक्षिकांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.