नाशिक

आदिवासी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

CD
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न जमीन वाद आणि कथित बेकायदेशीर कब्जाविरोधात १९ दिवसांपासून उपोषण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : कुटुंबातील जमीनवाटपाचा वाद आणि जमिनीवरील कथित बेकायदेशीर कब्जाविरोधात न्याय मिळावा, या मागणीसाठी आदिवासी बांधव मागील १९ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्या संगीता गायकवाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. शहरातील ईदगाह मैदान येथे आदिवासी बांधवांचे न्याय्य हक्क आणि जमीनविषयक मागण्यांसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. कुटुंबातील जमिनीचा वाद सोडवावा, तसेच जमिनीवरील कथित बेकायदेशीर कब्जा रोखावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सोमवारी (ता.१२) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी संगीता गायकवाड, सुनीता गायकवाड आणि विनोद भोसले यांनी आंदोलन केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगीता गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बाटलीतील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. दरम्यान, जमीनविषयक मागण्यांवर ठाम असलेल्या आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. फोटो क्रमांक :- एच-32125

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT