Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : बस- दुचाकी अपघातात कामगार जागीच ठार

महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीसमोर सिटीलिंक बस व दुचाकीची धडक दिल्याने कामगार शिवाजी झोटे हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळ साडेसातच्या दरम्यान घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीसमोर सिटीलिंक बस व दुचाकीची धडक दिल्याने कामगार शिवाजी झोटे हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. १३) सकाळ साडेसातच्या दरम्यान घडली. (Worker died on spot in bus two wheeler accident nashik news)

सिटीलिंक बस (एमएच-१५- जीव्ही-7698) येत असतानाच अचानक समोरून दुचाकीवरून येणारे लिज्जत पापड कंपनी कामगार शिवाजी झोटे (५३, शिवाजीनगर) यांच्यात अपघात झाला. झोटे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले.

घटनास्थळी गर्दी पांगवत वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक वसाहतीमधील अवजड वाहनांची पार्किंग रस्त्यावर केली जाते. त्यात टपऱ्यांचे अतिक्रमणामुळे वाहन चालकांना मोठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागते.

या समस्येकडे महापालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिसांनी लक्ष देवून मार्ग काढण्याची मागणी महिलांसह कामगार वर्गाने केली आहे.

रस्ता रुंदीकरण व बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केल्याने अपघात घडतात. या संदर्भात अनेकवेळा निवेदनाद्वारे मागणी करून ही औद्यागिक वसाहतीमधील प्रश्नाविषयी कारवाई होत नसल्याने असे अपघात होत असल्याचे बजरंग शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT