Beating esakal
नाशिक

Nashik Crime News: कर्जाचा एक हप्ता थकल्याने कामगाराला भररस्त्यात मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती घर, गाडी आणि शिक्षण यासह इतर गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेते. आयुष्यात अनिश्चितता असल्याने काही वेळा अशी परिस्थिती येते की कर्ज फेडण्यात अडचणी येतात. (worker was severely beaten for defaulting on loan installment nashik crime news)

मात्र बँक किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे आवश्यक असून बँकेचे अधिकारी सातत्याने ग्राहकांशी संपर्क साधतात. परंतु बँकेचे वसुली एजंट कर्ज वसुलीच्या नावाखाली गैरव्यवहार करतात, असे अनेकवेळा आढळून आले आहे आणि असाच एक प्रकार सातपूर आयटीआय सिग्नल येथे शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी आठच्या सुमारास घडला.

जत्रा हॉटेल येथून सातपूर औद्योगिक येथील कंपनीत कामाला जाण्यासाठी रवींद्र बारकू घिसाडी हे जात होते. दरम्यान याप्रसंगी रवींद्र घिसाडी यांना एका कंपनीचे रिकव्हरी एजंट दीपक सोनवणे व यश कोठुळे यांनी घिसाडी यांना थकलेल्या हप्त्याचे पैसे भरण्यास सांगितले व तसेच घिसाडी यांना शिवीगाळ केली. तसेच सिग्नलजवळ असलेल्या एका रॉडने त्यांच्यावर हल्ला केले.

घिसाडी हे बेशुद्ध अवस्थेत होते तरी देखील रिकव्हरी एजंट यांची मारहाण चालू होती. अखेर एकाने सातपूर पोलिस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली असता, तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले घिसाडी यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले, मात्र त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या डोक्यातून अतिरक्तस्राव चालू होता. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. या घटनेचा तपास सातपूर पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT