nashik sakal
नाशिक

झेरॉक्स नगरसेवकाच्या प्रतापामुळे अधिकारी ‘नॉट रिचेबल’

बेकायदा सुरू केलेली वसुली चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानिमित्त काही कार्यक्रमांचे उद्‌घाटनाचे निमित्त करून एका नगरसेविकेच्या पतीने अधिकाऱ्यांकडून बेकायदा सुरू केलेली वसुली चर्चेत आली आहे. झेरॉक्स नगरसेवकाच्या या तगाद्यामुळे अधिकारी वर्गाला कार्यालये सोडून फिल्डवर जावे लागले, तर अनेक अधिकाऱ्यांनी मोबाईल स्वीच ऑफ करणे पसंत केले.कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णालयांचे पेव फुटले. वैद्यकीय शिक्षण नसले तरी दोन- चार डॉक्टर एकत्र करून रुग्णालये थाटण्याचा नवा धंदा शहरात सुरू झाला.

कोरोनाकाळात रुग्णांना बेड व ऑक्सिजन मिळत नव्हते, त्या काळात बखळ कमाई काहींनी केली. कोरोना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाटेतही अनेकांना हात धुवून घ्यायचे आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या हस्ते विविध उद्‌घाटने करण्याचा धडाका सुरू आहे. शिवसेना नेत्यांच्या हस्ते काही कामांचे उद्‌घाटने येत्या काळात होणार आहे. असेच एक उद्‌घाटन होत असून एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या या उद्‌घाटनासाठी एका नगरसेविकेच्या पतीने अधिकाऱ्यांकडून वर्गणी गोळा करण्याचा धडाका गेल्या दोन दिवसांपासून लावला आहे. महापालिकेचे अधिकारी वर्गणीच्या तगाद्यामुळे शुक्रवारी (ता.२२) मेटाकुटीला आले. अनेक अधिकाऱ्यांना कार्यालयात न बसता थेट फिल्डवर जाणे पसंत केले, तर काहींना भ्रमणध्वनी स्वीच ऑफ करावा लागला.

खासगी वर्गणीची खुमासदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. आयजीच्या जिवावर बायजी करणाऱ्या झेरॉक्स नगरसेवकाच्या प्रतापामुळे डोक्याला हात लावण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसुलीच्या हातचलाखीवर मात्र सेना नेते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : E20 इंधनाच्या मुद्द्यावर लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा यासाठी आम्ही आज एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी करत आहोत - केजरीवाल

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT