NCP felicitated office bearers of Sharad Pawar group. esakal
नाशिक

Nashik NCP News: येवला मतदारसंघ पक्षाध्यक्ष पवारांना खंबीर साथ देणार : माणिकराव शिंदे

मतदारसंघ अध्यक्षपदी सुभाष निकम, तालुकाध्यक्षपदी विठ्ठल शेलार, तर योगेश सोनवणे शहराध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा

Nashik NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात अनेक जुन्या जाणत्या नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार गटाची नव्याने जम्बो कार्यकारिणी ॲड. माणिकराव शिंदे यांनी जाहीर करून मोठे संघटन उभे केले आहे. (yeola constituency party president will give strong support to Pawar Manikrao Shinde Nashik NCP News)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील यांच्या अनुमतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. मुंबई महानंदचे सुभाष निकम यांची मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, तर ज्येष्ठ नेते विठ्ठल शेलार यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

माजी आमदार जनार्दन पाटील यांच्या स्नूषा कालिंदी पाटील यांची महिला तालुकाध्यक्षपदी, तर व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांची राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. शरद पवार यांना अनेक शिलेदार सोडून गेल्यानंतर येवल्यात झालेल्या सभेने राज्यात श्री. पवार यांची ताकद दाखविली आहे.

यापुढेही हा मतदारसंघ भक्कमपणे एकोप्याने पवारांचा पाठीमागे उभा राहील. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट होईल, असा विश्वास माणिकराव शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

युवा नेते ॲड. शाहू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी युवक उपजिल्हाध्यक्षपदी येथील दीपक लाठे, तर युवक तालुका कार्याध्यक्षपदी साईनाथ मढवई, उपाध्यक्षपदी अशोक सोमासे, भरत धनगे, सरचिटणीसपदी सचिन कड, तर तालुका संघटकपदी भूषण दाभाडे यांची नियुक्ती केली. या पदाधिकाऱ्यांना शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवनियुक्त कार्यकारिणी अशी

विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष-सुभाष निकम, कार्याध्यक्ष-अजीज शेख, लासलगाव ४६ गावे अध्यक्ष-अंकुश तासकर, उपाध्याक्ष-संपत जाधव,

येवला तालुकाध्यक्ष-विठ्ठल शेलार, कार्याध्यक्ष-रामदास पवार, उपाध्यक्ष-सुभाष गायकवाड व अनिल शिंदे, सरचिटणीस-दिलीप गांजे, चिटणीस- नंदकुमार दाणे, सहचिटणीस-प्रमोद लभडे, खजिनदार-सुरेश कदम,

जिल्हा सहचिटणीस-बाळासाहेब पठारे, येवला शहराध्यक्ष-योगेश सोनवणे, उपाध्यक्ष-राजेंद्र हिरे, चिटणीस-एजाज शेख, सरचिटणीस-माजिद अन्सारी, महिला तालुकाध्यक्ष-कालिंदी पाटील, महिला शहराध्यक्ष-कल्पना शिंदे,

ओबीसी सेल तालुकाध्यक्ष-नारायण मोरे, उपाध्यक्ष-प्रकाश होंडे, व्यापारी सेल शहराध्यक्ष-अनिल मुथा, अल्पसंख्याक सेल-जिल्हाध्यक्ष अकबर शहा, शहराध्यक्ष निसार शेख, उप शहराध्यक्ष-अन्सार शेख, महिला शहराध्यक्ष-परवीन मोमीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT