नाशिक

२५ वर्षांपासून प्रलंबित चिंच्या मारुती मंदिर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात नगराध्यक्ष लोणारी यांच्या हस्ते भूमिपूजन; नगरसेवक महेश काबरा,समीर समदडिया यांच्या प्रयत्नांना यश

CD
YEO26B27108 येवला : चिंच्या मारुती मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी.समवेत नगरसेवक महेश काबरा,समीर समदडिया आदी. ------------ ३०-२ येवल्यात दीर्घकाळ प्रलंबित रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू नगरसेवक काबरा, समदडियांच्या प्रयत्नांना यश सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १० : येथे गेल्या पंचवीस वर्षांची प्रतीक्षा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारा त्रास अखेर संपणार असून शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील चिंच्या मारुती मंदिर ते छोटी जनता बोळ या मार्गाच्या काँक्रिटीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने नगरसेवक महेश काबरा व समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून प्रलंबित काम मार्गी लागत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या या परिसरातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष सहकार्याने काम मार्गी लागत असल्याचे सांगण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच नगरसेवक समदडिया, काबरा, दीपक लोणारी, पारुल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. बापू गाडेकर, नाना लहरे,अक्षय परदेशी,मॉन्टी पारख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress High Command Alert : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय! सर्व आमदार-खासदारांना तातडीने दिल्लीला बोलावले...

Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

Marathi News Live Updates : पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनबाहेर CJP कार्यकर्त्यांचं आंदोलन

सोनाली बेंद्रेला 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातील 'छम छम' गाण्यासाठी किती पैसे मिळाले? म्हणाली, 'केदार शिंदेने...'

Kaygaon News : गंगापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट! चारा छावण्यांसाठी प्रशासनाची धावपळ; शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे

SCROLL FOR NEXT