नाशिक

टंचाईची धग वाढली : येवला शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा! पाणीटंचाईची भीषणता :

CD
मेन YEO26B27243 येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात उपलब्ध असलेला पाणीसाठा. ----------- येवल्याला पाच दिवसाआड पाणी ------------- पाणीटंचाईची भीषणता : २५ दशलक्ष घनफूट पाणी अडीच महिने पुरवावे लागणार -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १९ : वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी झपाट्याने खालावत आहे. त्यातच पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तनही प्रमाणातच मिळणार असल्याने शहरावर आत्तापासूनच टंचाईचे ढग जमा झाले आहे. यामुळे नगरपालिकेने तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्याचा निर्णय सोमवारी (ता.१९) घेतला आहे. बुधवारपासून (ता.१९) त्याची अंमलबजावणी होईल. आठवड्यातून एकदाच पाणी मिळणार असल्याने येवलेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ येणार आहे. ------------- भविष्यातील टंचाई लक्षात घेऊन पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात सध्या २५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी आगामी अडीच महिने पालिकेला पुरवावे लागणार आहे. पालखेड डावा कालव्याचे १२ सप्टेंबरला आवर्तन आले होते. ओव्हरफ्लोच्या या आवर्तनाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात ४५ दशलक्ष पाणी घेण्यात आले होते. शहराला पावसाळ्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पूर्ण पावसाळा संपला तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात पाणीटंचाईचे नियोजन व्हावे यासाठी सोमवारी (ता.१९) निर्णय घेत तीन दिवसांऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पिण्यासाठीचे पाणी आवर्तन डिसेंबरमध्ये सोडण्याचे पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने स्पष्ट केले असून आगामी अडीच महिने शिल्लक पाणीसाठा पालिकेला वापरावा लागणार आहे. १६-१ विहिरीच्या उपसांचे काय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावालगत ३०० वर विहिरी, कूपनलिका असून यातून मोठ्या प्रमाणात तलावातील पाण्याचा उपसा होतो. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर आणि पाणीपुरवठा टप्पा क्रमांक दोनच्या योजनेच्या साठवण तलावाच्या परिसरातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचा उपशावर प्रशासनाने निर्बंध घालण्याची मागणी होत आहे. ------------- कोट पाण्याची दाहकता भयानक असून अजून ६-७ महिने बाकी आहेत. यामुळे नागरिकांनी पाणी वापरताना अपव्यय टाळावा. यंदा पावसाळा कमी झालेला असल्याने धरणात पाणीसाठा कमी उपलब्ध आहे. शासनाने पाणी पुरवठ्यात कपात सुचविलेली असून यामुळे हा निर्णय घेतला आहे. - तुषार आहेर, मुख्याधिकारी, नगरपालिका, येवला "प्रशासनाच्या सूचनेनुसार व संभाव्य टंचाईची दाहकता विचारात घेऊन पाणी कपात केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर कमी करताना झाडांना कमी पाणी द्यावे, वाहने धुवू नये, आंघोळ करताना अधिक पाणी वापरू नये, पाण्याचा अपव्यय टाळावा.नगरपालिकेला सहकार्य करावे. - राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष, येवला

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींना पकडणाऱ्या कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम?

Rain Update : दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा हाय अलर्ट! तर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Latest Marathi News Live Update : महायुतीला धक्का! फेरमतमोजणीची मागणी फेटाळली, सतेज पाटलांच्या समविचारी १३ तर महायुतीला १२ जागा

SCROLL FOR NEXT