नाशिक

सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये योगासन स्पर्धा दहा शाळांतील १०० स्पर्धकांचा सहभाग

CD
SNR26B23080 सिन्नर ः सिल्व्हर लोटस् स्कूलमध्ये योगा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू. ------------------- तालुका योगासन स्पर्धेत सिन्नरला १०० स्पर्धक -------------- विजेत्यांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड -------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१५ ः येथील सिल्व्हर लोटस् स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत तालुक्यातील १० शाळातील १०० स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भाजपचे युवा नेते उदय सांगळे, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ सचिव एस. बी. देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्यासपीठावर संस्थेचे प्रमुख दिलीप बिन्नर, संचालिका सोनल बिन्नर, जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव पिराजी नरवाडे, उपाध्यक्ष दीपक उपासनी, कोषाध्यक्ष मंदार भागवत, राहुल चौधरी आदी उपस्थित होते. स्पर्धेत शाळांमधील १४, १७ व १९ वर्षाआतील गटात शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दीपक उपासनी यांनी स्पर्धकांना नियम व अटी समजावून सांगितल्या. उदय सांगळे यांनी योगाची खरी किंमत ही साठीत गेल्यावर कळते, युवा पिढीने ही गोष्ट आजच आत्मसात करण्याचे आवाहन केले. एस बी देशमुख यांनी योगामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती वाढत असल्याचे सांगितले. संगीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र नन्नावरे आभार मानले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT