young boy death esakal
नाशिक

17 व्या वर्षीच जगाचा निरोप; वडिलांचे स्वप्नही अपूर्णच

दिपक देशमुख

झोडगे (जि.नाशिक) : बारा वर्षांपूर्वी बालपणी मातृछत्र हरवलेल्या 17 वर्षांचा शशांक संजय अहिरे हा बारावी विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर औषध निर्माण शाखेत प्रवेश घेऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्या घटनेने अहिरे कुटुंबावर मोठा आघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बालपणी हरवले मातृछत्र, वडिलांचे स्वप्नही अपूर्ण; 17व्या वर्षीच जगाचा निरोप

लहान असतानाच आई जगातून निघून गेल्याने नववीच्या वर्गात शिकत असलेला शशांक अणि त्याची बहिण पोरके झाले होते. शशांकचे वडील संजय अहिरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोजगारासाठी मुंबईची वाट धरली. तेथे काही दिवस हाँटेलमध्ये काम केले. त्यानंतर रिक्षा चालवून दोन्ही मुलाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिवसरात्र काम करुनी मुलांचे संगोपन करत असतानाच कोरोना संकटात रिक्षा व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहासाठी गावाकडील वाट धरावी लागली. पण गणेश विसर्जनाच्या दिवशी (ता.१९) आपल्या मित्र परिवारसह अस्ताने गावाजवळील मोती तलावात गणेश विसर्जनासाठी गेला असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. शशांकला वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मात्र तलावाच्या तळाशी शशांक अडकला. अणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. शशांकला बाहेर काढून उपचारासाठी झोडगे येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथून मालेगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र उपचारा पूर्वीच निधन झाले होते. शशांक अहिरे याचे गणेश विसर्जनच्या वेळी पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याने अस्तानेसह माळमाथा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT