Death esakal
नाशिक

Nashik News: औषध सेवन करीत युवतीने संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सातपूर परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय युवतीने छटपूजेच्या दुसऱ्याच दिवशी उंदीर मारण्याचे औषध सेवन केले. उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Young woman ended her life by consuming drugs Nashik News)

गौरी उमेश पंडित (वय १८, रा. निगळ गल्ली, सातपूर) असे मृत युवतीचे नाव आहे. रविवारी (ता. १९) उत्तर भारतीयांचा छटपूजेचा उत्सव होता. छटपूजेनंतर गौरीने परिसरामध्ये प्रसाद वाटप केला.

त्यानंतर अचानक ती तणावात गेली आणि मंगळवारी (ता. २१) तिने दुपारी एकला उंदीर मारण्याचे औषध सेवन केले. ही घटना लक्षात येताच वडील उमेश यांनी तिला अशोकनगर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उपचार सुरू असतानाच तिची प्रकृती खालावली आणि सोमवारी (ता. २७) तिचा मृत्यू झाला. शिक्षण घेत असलेल्या गौरीने अचानक विष का घेतले, याचे कारण समोर आलेले नाही.

पंडित कुटुंब मूळचे बिहारचे असून, ते मोलमजुरी करतात. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याप्रकरणी सातपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT