नाशिक

‘झिरो फॅटॅलिटी’त जिल्ह्याची कामगिरी उत्तम!

CD
NSK26H33312 जळगाव : ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीस उपस्थित जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण. --------- ‘झिरो फॅटॅलिटी’त जिल्ह्याची कामगिरी उत्तम! उपशीर्षक अपघातांवरुन वादंग तरी रस्ते सुरक्षा उपाययोजनांबाबत कौतुक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२२ : महामार्गावरील वळण रस्ता (बायपास) वाहतुकीसाठी बंद केल्यानंतरच्या दोन- अडीच महिन्यांत जळगाव शहरातील महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये ९ जणांचा बळी गेल्याने जनभावना तीव्र आहेत. असे असताना ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांचे परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी कौतुक केले आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक अभियांत्रिकी सुधारणांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमाच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा करण्यासोबतच महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक उपकरणांची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण यावर भर देण्यात येत आहे. चौकट रस्ते सुरक्षा प्रभावी करण्यावर भर ‘पीएम राहत’ योजनेंतर्गत संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या माध्यमातूनही नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. अभियांत्रिकी सुधारणा, नियमांची प्रभावी अंमलबजावणी, अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत आणि अतिक्रमण हटविणे या प्रमुख बाबींच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: भारत न्यूझीलंडचा दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Dengue Infection : डेंगीने आठ वर्षांच्या मुलीचा बळी; उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू

Latest Marathi News Live Update : 'हा' तर शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव; गुलाबराव पाटीलांनी केली ऑडिओ क्लिपच्या SIT चौकशीची मागणी

Mumbai News : शिक्षक नियुक्तीच्या पारदर्शकतेवर न्यायालयाचा शिक्कामोर्तब; शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

Vitamins Tips: कोणतं व्हिटॅमिन कधी घ्यावं? जाणून घ्या योग्य वेळ आणि महत्त्वाच्या गोष्टी!

SCROLL FOR NEXT