ST bearer Umaji Wadile and student Kundan Pawra while rescuing a pigeon stuck in the net of a kite. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेड्यात पतंगाच्या मांजात अडकलेल्या कबुतरास जीवदान

पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा अनेक वेळेला जीवघेणा ठरतोय.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मकरसंक्रांत आणि पतंग याचे एक अतूट नाते आहे. या सणानिमित्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडविण्याचा आनंद लुटत असतात.

पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा मांजा हा अनेक वेळेला जीवघेणा ठरतोय. (Pigeons got stuck in net of moth area near Shindkheda bus stand dhule news)

याचा प्रत्यय शिंदखेडा शहरात आला. बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या परिसरात आकाशात उडणाऱ्या पतंगाच्या मांजात कबुतर अडकले होते.

पाहणाऱ्यांच्या हे वेळीच लक्षात आल्याने कबुतर जमिनीवर आल्यानंतर त्याभोवती असलेला मांजा काढून कबुतराला जीवदान देण्यात आले व पुन्हा आकाशात सोडून देण्यात आले.

त्यामुळे पतंग उडविताना व त्याचा आनंद घेताना मोठ्यांनी व बालगोपालांनी पक्क्या मांजाचा वापर करू नये याची खबरदारी घ्यावी.

मांजामुळे अनेक वेळेला जीवघेण्या दुर्घटना घडतात. अशीच दुर्घटना शिंदखेडा शहरात घडली. शिंदखेडा बसस्थानकालगत शासकीय गुदामाच्या आवारात एक कबुतर पतंगाच्या मांजात अडकून तडफडत असल्याचे ‘सकाळ’चे शहर प्रतिनिधी जितेंद्र मेखे यांच्या लक्षात आले.

त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी असलेल्या एसटी वाहक उमाजी वाडिले व स्वामी समर्थ विद्यालयातील नववीत शिकणारा विद्यार्थी कुंदन पावरा यांच्या मदतीने या कबुतराची सुखरूप सुटका केली.

तेथून जवळच असलेले दिनेश गोसावी यांच्या चहाच्या दुकानातून पाणी आणून त्या कबुतरास पाजले व जीवदान दिले. त्या कबुतराला पुन्हा आकाशात सोडून देण्यात आले. एका कबुतराचे प्राण वाचविण्याचे समाधान तिघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT