उत्तर महाराष्ट्र

सायखेड्यात घरफोडी ; दोन दुचाकींसह चोरटे फरार

संजय भागवत

सायखेडा : सायखेडा येथे घर बंद असल्याची संधी साधत आज (ता.१०) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून दोन मोटारसायकल व दोन एलसीडी टीव्ही लंपास केले. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सायखेडा येथे काॅलेजरोडवरील हिमालय काॅलनीत डॉ.आबा पाटील यांच्या बंगल्यात शिक्षक संतोष भुसे हे भाडेकरू म्हणून राहतात. दिवाळीनिमित्त ते घराला कुलूप लावून शुक्रवारी भावाकडे कुटुंबासह सिन्नरला गेले होते. आज (ता.१०) त्यांचा दुधवाला सकाळी आठ वाजता दूध देण्यास आला. तेव्हा त्याला बंगल्याचे गेट व घराचा दरवाजा उघडा दिसला. याबाबत त्याने संतोष भुसे आणि शेजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर भुसे तातडीने  सिन्नरहून सायखेडा येथे आले.

सायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले. चोरट्यांनी घरातील दोन टीव्ही तसेच बंगल्याच्या आवारात पार्क केलेली पॅशन मोटरसायकल (एमएच 15 सीयू 1119) व हिरो मॅस्ट्रो मोपेडे (एमएच 15 ओएफ 2709) असा सुमारे 70 हजारांचा माल चोरून पलायन केले.

दरम्यान, या शांततेच्या परिसरात चोरीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daughters Property Rights India : …तर मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार नाही, नवीन कायदा काय सांगतो?

जुन्या ५०० अन् १००० च्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

"मी खूप दारू पिऊ लागले" धुरंधर फेम गायिकेने केला व्यसनाधीनतेबद्दल खुलासा "माझ्या पालकांनी माझं मन मोडलं"

Punjab Kings: पंजाब किंग्सचा दबदबा! IPL 2026 मध्ये कोणालच न जमलेला कारनामा श्रेयस अय्यरच्या शिलेदारांनी करून दाखवला

PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT