Abdullah Ansari esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : खदाणीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बाभळे (ता. शिंदखेडा) येथील औद्योगिक वसाहतीतील दगड खोदकाम केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १४) सकाळी घडली.

अब्दुल्ला मुसा अन्सारी (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.(School boy dies due to drowning dhule news )

वडिलांसोबतच तो खदाणीत आंघोळीला गेला होता. बाभळे औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती लाकूड मिल येथे अब्दुल्लाचे सावत्र वडील मोहम्मद रेहमान अन्सारी कामाला होते.

वडील व आई सईदा बेगम यांच्या सोबत तो राहत होता. शनिवारी वडिलांसोबत अब्दुल्ला व इतर दोन मुले पाण्याने भरलेल्या खदाणीवर आंघोळीसाठी गेले असता ही घटना घडली. अब्दुलाची शोधाशोध केली. पण तो मिळून आला नाही.

सोबत आलेली मुले लहान असल्याने ते काही सांगू शकले नाही. ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेत मृतदेह बाहेर काढला. सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

वडील मोहम्मद रेहमान अन्सारी यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली ती शिंदखेडा पोलिसांत वर्ग करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT