Dense fog spread over the farm esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain Damage : रब्बी हंगामही अडचणीत; बभळाज परिसरात पसरली धुक्याची चादर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Unseasonal Rain Damage : या वर्षी आधीच खरिपातील हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापूस, केळी, पपई, फळबागांचे नुकसान झाले आणि आता पसरणाऱ्या दाट धुक्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसह टोमॅटो केळी, पपई, भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.(sheet of fog spread in Babhalaj area dhule unseasonal rain damage news)

आधीच अवकाळी पावसाने झोडपले, त्यातच आधी बेजार झालेला शेतकरी सध्या पसरणाऱ्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या दाट धुक्यामुळे याचा परिणाम टोमॅटो, केळी, पपई भाजीपाल्यासह गहू, हरभरा, मका या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील कापूस, केळी, पपई, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानातून सावरत नाही तेवढ्यातच या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मांजरोद, पिळोदा शेतशिवारात शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

टोमॅटो पिकासाठी लागवडीपासून ते उभारणी करण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला असून, परिसरात पसरणाऱ्या दाट धुक्यामुळे टोमॅटो पिकावर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दाट धुक्यामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजार बळावण्याचीदेखील शक्यता असल्याचे बोलले जात आहे

''पंचवीस एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. एक एकर क्षेत्राला कमीत कमी जवळपास ८०/९० हजार रुपयांचा खर्च येतो. मोठ्या प्रमाणावर खर्च करून टोमॅटो पिकाची लागवड केली आहे; परंतु २७ नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले, तसेच सकाळी रोज होणाऱ्या धुक्यामुळे टोमॅटो पिकावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे.''-ललित पाटील, युवा शेतकरी, मांजरोद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT