dhule market committee esakal
उत्तर महाराष्ट्र

Shirpur Market Committee Election : शेतकरी विकासला कपबशी, शेतकरी बचावला शिटी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील बाजार समितीच्या संचालकपदासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत शुक्रवारी (ता. २१) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. (Shirpur Market Committee Election cup saucer for shetkari vikas and whistle symbol for shetkari bachav panel given dhule news)

आमदार अमरिशभाई पटेलप्रमीत शेतकरी विकास पॅनलला कपबशी, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी बचाव पॅनलला शिटी चिन्ह देण्यात आले. दरम्यान, शेतकरी विकास पॅनलने व्यापारी-अडते व हमाल-मापाडी मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिलेला नाही. शेतकरी बचाव पॅनलने व्यापारी मतदारसंघात एक उमेदवार दिला असून, हमाल-मापाडी मतदारसंघात त्यांचाही अधिकृत उमेदवार नाही.

बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. २० एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी १९ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.

मतदारसंघानिहाय उमेदवार असे ः सोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) : बाळासाहेब पाटील (शिटी), किरण गुजराथी (कपबशी), शांतिलाल जमादार (कपबशी), अरविंददास पाटील (कपबशी), कांतिलाल पाटील (कपबशी), चंदू पाटील (कपबशी), मनोहर पाटील (शिटी), मिलिंद पाटील (शिटी), मोहन पाटील (शिटी), शरद पाटील (शिटी), शिवाजी पाटील (कपबशी), संतोष पाटील (शिटी), विठोबा महाजन (कपबशी), गोपालसिंह राजपूत (शिटी).

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सोसायटी महिला मतदारसंघ (दोन जागा) : मेघा पाटील (कपबशी), मनीषा मराठे (कपबशी), उज्ज्वला महाजन (शिटी), संगीताबाई राजपूत (शिटी).

सोसायटी इतर मागास प्रवर्ग (एक जागा) : प्रसाद पाटील (कपबशी), मनोहर भदाणे (शिटी).

सोसायटी अनुसूचित जमाती (एक जागा) : कृष्णा पावरा (कपबशी), मोहन पावरा (शिटी).

ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ (दोन जागा) : हिरालाल परदेशी (शिटी), लक्ष्मीकांत पाटील (कपबशी), आनंदसिंह राऊळ (कपबशी).

ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती (एक जागा) : जगन पावरा (कपबशी), विलास पावरा (शिटी).

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक (एक जागा) : मिलिंद बोरसे (कपबशी), हेमराज राजपूत (शिटी).

व्यापारी मतदारसंघ (दोन जागा) : अर्पित अग्रवाल (पंखा), संतोष चौधरी (टेलिफोन), सतीश जैन (टोपी), मोहन पाटील (छत्री), सतीश मोरे (शिटी).

हमाल-मापाडी मतदारसंघ (एक जागा) : किरण कढरे (ऑटोरिक्षा), डॅनी चांदे (विमान), प्रकाश रुखमे (पणती).

मतदान ३० एप्रिलला

निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर दोन्ही पॅनल्ससह स्वतंत्र उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. ३० एप्रिलला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी व्ही. बी. पापुलवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT