Agriculture esakal
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार : पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतेत

पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कळंबू (जि. नंदुरबार) : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी कालावधीही निघून जात असल्याने यंदाच्या पेरण्याही यशस्वी होतील की नाही या विवंचनेत बळिराजा आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लाऊन पावसाची वाट पाहत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली खरी मात्र शहादा तालुक्यात अद्यापही एकही पाऊस समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत असून, पेरण्या खोळंबल्या असल्याचे चित्र आहे.

पावसाने दडी दिल्याने शेतात वखरणी करायची आहे, मात्र पाऊस न झाल्यामुळे हे शेतातील ढेकळे फुटत नाहीत. आता बळिराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. पदरमोड करुन, उसनवारी करुन खत, बी बियाणे शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत. आता फक्त प्रतीक्षा फक्त पावसाची आहे यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरवात केली आहे. मात्र शहादा तालुक्यातील अनेक गावामध्ये अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. आज येईल, उद्या येईल या भरवशावर पूर्ण जून महिना उलटण्याच्या मार्गावर आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी आकाशाकडे डोळे लाऊन पावसाची वाट पाहत आहे.

१२ जूनला झालेल्या पहिल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळिराजा हवालदिल झाला. लावणी केलेले महागडे कापूस बियाणे वाया जाऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रोजच दिवसभर उकाडा होऊन वातावरणात बदल होतो, मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंतातुर आहे. शेतमजुरांच्या हाती कामे नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT