Crime News Esakal
उत्तर महाराष्ट्र

Crime News: नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार! अंधश्रद्धेतून महिलेला मारहाण करत खाऊ घातली स्मशानभूमीतील राख

शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेचे अनेक बळी जात आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याचा दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेचे अनेक बळी जात आहेत. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धेमुळे अनेक जण याला बळी जातात. अशातच या भागामध्ये डाकीण प्रथा कायम असल्याचे दिसून येत आहे. डाकीण असल्याच्या संशयातून अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात ओघाणी गावाच्या चापडापाडा गावात एका महिलेला मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्या महिलेला स्मशानभूमीत घेऊन जात त्या ठिकाणची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

जादुटोणा करून युवक आणि महिलेला मारून टाकल्याचा आरोप करत पीडित महिलेला स्मशान भूमीत घेऊन जाऊन मारहाण करून स्मशानातील राख खाऊ घातली. त्याचबरोबर आपल्या परिवाराला त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. (Marathi Tajya Batmya)

सातपुड्याच्या दुर्गम भागात शिक्षणाचा आणि आरोग्य सेवेचा अभाव आणि त्यातच अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने डाकीण सारखी प्रथा आजही कायम आहे. पोलीस प्रशासन या घटना गांभीर्यपूर्वक घेत असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जनजागृती ही केली जात आहे.

संबधित प्रकरणात मोलगी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.(Latest Maharashtra News)

दरम्यान काही महिन्यांपुर्वी सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात अघोरी आणि अमानवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मुलं होत नाही आणि घरात सुख समृद्धी मिळावी म्हणून एका महिलेला चक्क स्मशानातील हाडांची राख खायला घातली तर राखेचे पाणी पाजले होते. उच्च शिक्षित असलेल्या कुटुंबातील संगणक अभियंता असलेल्या महिलेसोबत हा सगळं प्रकार घडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

BEST Bus: मुंबईकरांसाठी दिलासा! BEST बससेवेत मोठे बदल; काही रूट बंद, काही वळवले, वाचा नवीन मार्गांची यादी

Latest Marathi News Live Update : इस्रायलचा इराणच्या अनेक भागात हल्ला

Kolhapur CNG Hydro : हायड्रो टेस्टिंग दरात चार ते पाचपट वाढ; रिक्षाचालक संघटनांचा तीव्र विरोध

Pune Road Accident : बाप-लेकाचा तो प्रवास ठरला शेवटचा! कात्रजमध्ये ट्रकने तीन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच अंत!

SCROLL FOR NEXT