उत्तर महाराष्ट्र

सायखेङा येथे घरफोङी; दोन मोटरसायकलसह दोन टीव्ही घेवून चोरटे फरार

संजय भागवत

सायखेङा- सायखेङा येथे घर बंद असल्याची संधी साधत आज (ता.10) पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोङी करून दोन मोटारसायकल व दोन एल.सी.ङी टिव्ही लंपास केले. चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सायखेङा येथे काॅलेजरोङ वरील हिमालय काॅलनीत ङाॅ. आबा पाटील यांच्या बंगल्यात शिक्षक संतोष भुसे हे भाङेकरू म्हणून राहतात.दिवाळी निमित्त ते घराला कुलुप लावून शुक्रवारी भावाकङे कुटुंबासह सिन्नरला गेले होते.

आज (ता.10) त्यांचा दुधवाला सकाळी आठ वाजता दुध देण्यास आला तेव्हा त्याला बंगल्याचे गेट व घराचा दरवाजा उघङा दिसला.त्याबाबत त्याने संतोष भुसे यांना कळवताच त्यांनी शेजार्यांना घटनेबाबत माहिती दिली व ते पण तातडने सिन्नरहून सायखेङा येथे आले. सायखेङा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे पोलिस कर्मचार्यासह दाखल झाले. घरातील कपाटातील कपङे चोरट्यांनी अस्तव्यस्त केलेले होते. चोरट्यांनी घरातील दोन टिव्ही तसेच बंगल्याच्या आवारात पार्क केलेली पॅशन मोटरसायकल(एम. एच .15 सी. यू. 1999) व हिरो मॅस्ट्रो मोपेङ (एम. एच. 15 एफ 2709) असा 70 हजाराचा माल चोरट्यांनी चोरून पलायन केले.

घटनास्थळी स्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतू, स्वानाने ज्युनिअर काॅलेज परिसराचा माग दाखवत तेथेच घुटमळले. तसेच, ठसे तज्ञानी वस्तूंवरील ठसे संग्रहित केले आहे. हिमालय काॅलनीतील बंगल्यांमध्ये व्यावसायिक व नोकरदार वर्ग वास्तव्यास आहे.शांत परिसरात चोरीच्या घटना घडल्याने खळबळ माजली आहे. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT